esakal | भीषण अपघात; कुत्र्याला वाचववताना कारचा झाला चुराडा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News washim man died in a car accident rescuing a dog

नागपूर-मुंबई या महार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भीषण अपघात; कुत्र्याला वाचववताना कारचा झाला चुराडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम: नागपूर-मुंबई या महार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अमरावती येथून कामरगावकडे येणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातातएक जण जागीच ठार तर इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर - मुंबई या महामार्गावरील म्हसला फाट्यानजीक घडली.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील अब्दुल अजिज अब्दुल हकीम ( वय 29 वर्षे ) हे आपल्या परिवारासह कारने परत येत असताना म्हसला फाट्यानजीक कुत्रा आडवा आल्यानं त्यांच्या कारचा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला आहे.

हेही वाचा - 

या कार अपघातात अब्दुल अजीज हे घटनास्थळीच ठार झाले असून अब्दुल अजीम अब्दुल हकीम ( वय 32 वर्षे ),असिया परवीन अब्दुल अजीम ( वय 24 वर्षे )  आणि तीन वर्षीय मुलगा महफुज अब्दुल अजीम हे तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठीअमरावती येथे पाठवण्यात आले आहे. पुढील तपास धनज पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या

loading image