
अकोट शहरातील सांडपाणी हे खाई नदीत जाते. त्याऐवजी ते पाईपलाईनद्वारे शहराबाहेर न्यावे, त्यावर प्रक्रिया करावी तसेच नदी व परिसराचे सौंदर्यीकरण व विकास करण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी अकोट येथे दिले.
अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील सांडपाणी हे खाई नदीत जाते. त्याऐवजी ते पाईपलाईनद्वारे शहराबाहेर न्यावे, त्यावर प्रक्रिया करावी तसेच नदी व परिसराचे सौंदर्यीकरण व विकास करण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी अकोट येथे दिले.
पालकमंत्री कडू यांनी अकोट शहरातील खाई नदी परिसराची पाहणी केली. यावेळी अकोटचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, नपा मुख्याधिकारी एस.एन.वाघूरवाघ तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - जिल्हा परिषदेचे १९ शिक्षक झाले कंत्राटी, वाचा काय असेल कारण
शहरातील खाई नदीचे आवश्यक तेथे खोलीकरण, रुंदीकरण करून सौंदर्यीकरण करता येण्याबाबत आज ही पाहणी करण्यात आली. त्यासाठी सांडपाणी हे बंदिस्त पाईपलाईनद्वारे शहराबाहेर नेऊन त्यावर प्रक्रिया करणे, नदी पात्राचे रुंदीकरण, तेथे वृक्ष लागवड करून सौंदर्यीकरण करणे याबाबत यंत्रणांनी लवकरात सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
(संपादन - विवेक मेतकर)