
पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ला आग लागल्याची घटना घडलीय या आगीत पाच जणांचा मृत्यु झालाय यापैकी एक हा अकोल्यातील चांदुर येथील महेंद्र प्रकाश इंगळे याचा समावेश आहे.
अकोला: पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ला आग लागल्याची घटना घडलीय या आगीत पाच जणांचा मृत्यु झालाय यापैकी एक हा अकोल्यातील चांदुर येथील महेंद्र प्रकाश इंगळे याचा समावेश आहे.
कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. लस निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीत कोरोनावरील कोविशिल्ड लस तयार होत आहे.
हेही वाचा - अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही!
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. भीषण अशी ही आग असून धुराचे लोट आकाशात पसरले होते. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
दरम्यान, अकोला येथील महेश हा नवीन बिल्डिंगला मेंटन्स साठी गेला होता, लागलेल्या आगीत त्याचा मृत्यु झालाय त्याचा मृतदेह आज अकोल्यात येणार असून त्यांच्यावर अकोल्यातील चांदुर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महेश यांच्या मृत्यू मुळे चांदुर परिसरात शोककळा पसरली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)