
गुडधी येथील अनाथाश्रमात लहानाची माेठी झालेल्या अनुराधाचा विवाह ३१ जानेवारी राेजी ठरला. पती मिळाला, कुटुंबही मिळाले.
अकाेला : गुडधी येथील अनाथाश्रमात लहानाची माेठी झालेल्या अनुराधाचा विवाह ३१ जानेवारी राेजी ठरला. पती मिळाला, कुटुंबही मिळाले.
अनाथ असल्याचे दु:ख आता दूर हाेईल या आनंदात असतानाच तिचे सुख नियतीलाही पाहवले नसल्याचे १९ जानेवारी सायंकाळी घडलेल्या घटनेवरून समाेर आले.
हेही वाचा - लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याने लढविली ग्रामपंचायतची निवडणूक, निकाल तर पहा
अगदी लहान असतानाच अनुराधा वानखडे हिला गुडधी येथील अनाथाश्रमामध्ये ठेवण्यात आले हाेते. येथेच ती लहानाची माेठी झाली. आयुष्यात अनाथ असल्याचे प्रचंड दु:ख कायमचेच. मात्र, ती १८ वर्षाची हाेताच तिला जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी शिवा वानरे यांनी लग्नाची मागणी घातली.
अनुराधालाही प्रचंड आनंद झाला. आयुष्यातील दु:खाची रात्र ३१ जानेवारी राेजी संपणार होती. विवाह बंधनात अडकण्याच्या आनंदात असतानाच अनुराधाला अनाथाश्रमामध्ये मंगळवारी सायंकाळी वरच्या माळ्यावर अचानक विजेचा धक्का लागला.
हेही वाचा - अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनुराधाला तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारही सुरू झाले मात्र काही वेळातच अनुराधाचा मृत्यू झाला.
हेही वाचा - या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
या घटनेची माहिती शिवा वानरे यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. अनुराधाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला.
हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला
एका अनाथ मुलीशी विवाह करून एक वेगळी प्रेरणा देण्याचा प्रयत्न शिवाने केला हाेता. मात्र दाेघांचेही सुख नियतीला पाहवले नाही आणि एका अपघातात अनुराधाचा मृत्यू हाेताच एका संसारवेलीचा सुरुवात हाेण्यापूर्वीच घात झाला.
(संपादन - विवेक मेतकर)