येणारा आठवडा धोक्याचा! आठवडाभरात वातावरण बदल; तापमान वाढीसह वादळी पावसाचे संकेत

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 1 February 2021

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच थंडी काढता पाय घेणार असून, दुसऱ्या आठवड्यात अकोल्यासह विदर्भात काही जिल्ह्यात तापमान वाढ व वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

अकोला : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच थंडी काढता पाय घेणार असून, दुसऱ्या आठवड्यात अकोल्यासह विदर्भात काही जिल्ह्यात तापमान वाढ व वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने जमिनीला ओल राहून हिवाळ्यात अधिक गारवा जाणवेल किंवा कडाक्याची थंडी अकोलेकरांना अनुभवाला येईल अशी अपेक्षा होती. परंतु, यंदा थंडीने अकोलेकरांना जणूकाही हुलकावणीच दिली असून, कधी ढगाळ, कधी उष्ण तर कधी तात्पुरता गारवा असे मिश्र वातावरण हिवाळ्यात जाणवत आहे.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

गेल्या आवठवड्यात तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाल्याने २० जानेवारीला तर कमाल ३४.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. मात्र उत्तरेकडील प्रदेशात थंडी वाढल्याने या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा गारवा अकोल्यासह विदर्भातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनुभवायला येत आहे. मात्र आठवडाभरात हा गारवा कमी होऊन वातावरणात बदल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शिवाय पुढील आठवड्यात काही भागात वादळी पावसाची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा - Union Budget 2021: अर्थसंकल्पात सरकारला करावी लागेल उधळपट्टी - अर्थतज्ञ संजय खडक्कार

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम म्हणून तीन ते चार दिवसांपासून विदर्भात गारवा जाणवत आहे. परंतु, आठवडाभरात वातावरणात बदल होऊन थंडी कमी होत जाईल. त्यानंतर तापमानात वाढीसह काही भागात वादळी पाऊस सुद्धा हजेरी लावू शकतो.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

हरभरा, गव्हाला बसू शकतो फटका
वातावरणातील बदल व वादळी पावसाने हजेरी लावल्यास हरभरा व गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसू शकतो. शिवाय फळ उत्पादनाचे सुद्धा नुकसान होऊ शकते.

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi Weather News Dangerous next week! Climate change during the week; Signs of stormy rain with temperature rise