अकाेला : एमबीबीएस प्रवेशासाठी ५५ लाखांची मागणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola MBBS admission Demand 55 lakh fraud case Filed

अकाेला : एमबीबीएस प्रवेशासाठी ५५ लाखांची मागणी!

अकोट : तालुक्यातील अकोलखेड येथील व्यक्तीला एमबीबीएसला मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे म्हणून त्याच्याकडून १६ लाख ६० हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

तालुक्यातील अकोलखेड येथील रहिवाशी अनिल श्रीराम भांडे (वय ४१) यांचा मुलगा सनराज भांडे याला वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळावा म्हणून नाशिक, वर्धा व जळगाव येथील खासगी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी धडपड चालू होती. यादरम्यान भांडे यांना वेगवेगळ्या काउन्सिलचे फोन येत होते. ता. १२ नोव्हेंबर रोजी भांडे यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. आपल्याला कमी खर्चात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देत असल्याचे सांगण्यात आले.

भांडे यांना मोबाईलवर सतत प्रवेशसंबंधी मॅसेज येत असल्याने संबंधित व्यक्ती खरा काउंन्सिल असल्याचे भांडे यांना वाटले. त्यामुळे त्या व्यक्तीसोबत फोनवर बोलने झाल्यावर त्याने भांडे यांच्या मुलाचे शैक्षणिक कागपत्रांची प्रत मागीतली. भांडे यांनीही त्या अज्ञात व्यक्तीकडे सनराज याच्या शैक्षणिक कागपत्रांची प्रत पाठवली.

कागपत्रांची पाहणी केल्यानंंतर त्या व्यक्तीने प्रवेशाबाबत मुंबईला बैठक घेण्याचे सांगीतले. ता. ११ डिसेंबर २०२१ पासून एमबीबीएस प्रवेशाबाबत व्हाट्सॲपवर सतत अपडेट येत होती. ता. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सनराजने त्या अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यात आरटीजीएस करून सहा लाख रुपये पाठविले. या रकमेत ६० हजार रुपये कमी पाठवण्यात आल्याचे त्या व्यक्तीकडून भांडे यांना विचारणा करण्यात आली. त्यामुळे ता. २५ मार्च रोजी पेटीएमने संबंधित व्यक्तीला पाठविण्यात आले.

जळगावात व्यवहार करून फोन बंद केला सहा लाख ६० हजार रुपये मिळाल्यानंतर प्रवेशाकरिता ता. १ एप्रिल रोजी जळगाव येथे दहा लाख रुपये घेऊन भांडे यांना बोलावण्यात आले. संबंधित व्यक्तीवर विश्‍वास ठेऊन भांडे व त्यांचा मुलगा सनराज जळगाव येथे गेले. यावेळी राकेश जाधव नाकम व्यक्तीला भांडे यांनी दहा लाख रुपये दिले. त्यानंतर प्रवेशाबाबत भांडे संबंधित व्यक्तीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असता, ता. ५ एप्रिलपासून त्याचा फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.

महाविद्यालयाचे हात वर

राकेश जाधव याचा फोन बंद असल्यामुळे भांडे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात विचरणा केली असता, त्या व्यक्तीचे व महाविद्यालयाचे काहीच देणेघेणे नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे भांडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे अनिल श्रीराम भांडे (वय ४१ रा. अकोलखेड) यांनी अकोट शहर पोलिस स्टेशनला राकेश जाधव, अतुल तिवारी यांच्या विरुद्ध तक्रार दिली. भांडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.

Web Title: Akola Mbbs Admission Demand 55 Lakh Fraud Case Filed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top