
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; नराधमाला जन्मठेप
अकोला - मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील २२ वर्षी युवक आकाश अग्रवाल सोळंके याला प्रेम संबंधातून अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याप्रकरणी पोस्को कायद्या अंतर्गत दोषी ठरवून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दीड लाख रुपयांचा दंड मंगळवारी ठोठावला आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, आकाश सोळंके याने १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देवून तिचेशी प्रेम संबंध जोडून तिचेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहली. या मुलीने मूर्तिजापूर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ता.१९ नोव्हेंबर २०१६ रोजी पोस्को व भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली. ती शासकीय स्त्री रुग्णालयात उपचार घेत असताना तिची प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंग सोळंके यांनी केला.
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे गुन्हा सिद्ध करण्यासाठी सात साक्षिदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षिपुरावे ग्राह्य धरून आकाश सोळंकेला भादंवी ३७६ (दोन) (तीन) मध्ये जन्मठेपेचे शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, पोस्को कलम चारमध्ये जन्मठेप व ५० हजार रुपये व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, पोस्के कलम पाच (एक)मध्ये जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. आजन्म कारावास व दीड लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असून, सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकार पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी मांडली. पैरवी अधिकार म्हणून पीएसआय प्रवीण पाटील व नारायण शिंदे यांनी काम बघितले.
Web Title: Akola Minor Girl Pregnant From 22 Years Old Youth Affair Sessions Court Life Imprisonment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..