Akola Hospital Inspection : आ. रणधीर सावरकर यांची सर्वोपचार रुग्णालयात अचानक पाहणी; रुग्णसेवेतील अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश!

Government Hospital : आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालयात अचानक पाहणी करून रुग्णसेवेत येणाऱ्या अडथळ्यांचा आढावा घेतला. सुविधा, मनुष्यबळ, मशीनरी आणि विभागीय कामांबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
MLA Randhir Savarkar Conducts Surprise Inspection at Akola Government Hospital

MLA Randhir Savarkar Conducts Surprise Inspection at Akola Government Hospital

Sakal

Updated on

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय तसेच सिटी सुपर हॉस्पिटल परिसराची आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक पाहणी केली. रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभाग, मनुष्यबळ, मशीनरी, कॅथलॅब, व्हेंटिलेटर सुविधा, न्यूरो सर्जरी उपकरणे आणि रिक्त पदभरती याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करताना रुग्णसेवेतील अडथळे दुर करण्याचे निर्देश अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com