अकाेला : मनसेचे नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola MNS agitation

अकाेला : मनसेचे नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन

मालेगाव : मागील आठवड्यात काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने तीन गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे आदीवासी बहुल गावांच्या दळणवळणाला खोळंबा बसला आहे. ता. ३ रोजी मनसे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सीताबाई धंदरे यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी काटेपूर्णा नदीत अर्धनग्न आंदोलन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व आंदोलन स्थळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. मालेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भागामधून अमानवाडी फाटा ते किन्हीराजा जवळपास आठ-दहा किमीचा रस्ता आहे. ह्या रस्त्यावर कुत्तरडोह या संपूर्ण आदिवासी गावालगतच वाहणाऱ्या काटेपूर्णा या मोठ्या नदीवर छोटासा पुल आहे. परिणामी प्रत्येक वर्षी चांगली पर्जन्यवृष्टी झाली की तीन ते चार फुट या पुलावरून नदी ओसांडून वाहते. त्यामुळे अमानवाडी फाटा ते किन्हीराजा ह्या रस्त्यावरील दळणवळण कित्येक दिवस ठप्प होते.

कुत्तरडोह, रामराव वाडी, पिंपळशेंडा कवरदरी सह आदीवासी बहुल गावांसमोर आवागमनाच्या मोठ्या समस्या उद्भवतात. किमान पाच-दहा फुट पुलाची उंची वाढवून रुंदीकरण व कठडे उभारणे गरजेचे आहे. तेव्हा या बाबत पावसाळ्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सिताबाई धंदरे हयांनी निवेदन देऊन पुलांची उंची रुंदीकरणासह वाढवण्याची मागणी केली होती. मात्र संबंधीत विभागाने वेळकाढूपणा केल्याने पुनश्च निवेदन देण्यात आले.

परंतू काहीही समस्येचे निराकरण न झाल्याने मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष सीताबाई धंदरे यांच्या नेतृत्वात मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे सह मनसेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घोषणा देत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. तसेच परिसरातील अनेक गावांची त्रस्त मंडळीसुध्दा या आंदोलनात सहभागी होती.

यावेळी आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जोगदंड यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांना पुलाची उंची वाढवून व काम करण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता.

Web Title: Akola Mns Half Naked Agitation In River Basin Regarding Bridge Construction Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..