अरे देवा ! दगडाने ठेचून पोटच्या मुलानेच केली आईची हत्या; काय असेल कारण...वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

भर रस्त्यात मारहाण केली. त्यानंतर तिला खाली पाडून तिच्या चेहऱ्यावर दगडाने वार केले. यामध्ये महिला जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मारेकरी मुलगा अमोल येवले यास ताब्यात घेतले आहे.

बोरगाव मंजू (जि. अकोला) : आईसोबत पायी जाणाऱ्या मुलाने राष्ट्रीय महामार्ग क्रं. सहावर भर रस्त्यात दगडाने ठेचून आईचा खून केल्याची घटना रविवारी (ता.31) सायंकाळी येथील नवीन बायपास महामार्गाजवळ घडली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून, हत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. शशिकला तुकाराम येवले असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा- दुर्दैवी: मेळघाटातील डॉक्टराचा अकोल्यात मृत्यू!

महामार्गावरच घडली घटना
बोरगाव मंजू वरून मूर्तिजापूरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रं. सहावरून मायलेक पायी जात होते. गावापासून थोडे दूर अंतरावर आल्यानंतर दूर अंतरावर आल्यानंतर मार्गावरील नवीन बायपास जवळ मुलगा अमोल तुकाराम येवले (वय 35) याने त्याची आई शशिकला तुकाराम येवले (वय 60) हिला भर रस्त्यात मारहाण केली. त्यानंतर तिला खाली पाडून तिच्या चेहऱ्यावर दगडाने वार केले. यामध्ये महिला जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मारेकरी मुलगा अमोल येवले यास ताब्यात घेतले आहे. या घटने मागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक संतोष अघाव, विंष्णू ढोरे करीत आहेत. 

क्लिक करा- अरे अरे अकोल्यात कोरोनामुळे मृत्यू सत्र सुरूच; एकाच दिवशी...

परिसरात चर्चेला उधान
गावापासून थोड्याच अंतराव आलेल्या मायलेकामध्ये काय झाले असणार की, पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याची घटना घडली असेल, मारहाण करण्याचे कारण काय? अशा प्रकारच्या अनेक प्रश्‍नांची परिसरात चर्चेचा उधान आले आहे. बोरगाव पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून याबाबत सत्यता बाहेर येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola The mother was hit in the face with a stone, Police took the boy into custody