esakal | अकोला: मोठी उमरी, कौलखेड, गौरक्षण रोड, खडकी, मलकापूर प्रतिबंधित क्षेत्र

बोलून बातमी शोधा

अकोला: मोठी उमरी, कौलखेड, गौरक्षण रोड, खडकी, मलकापूर प्रतिबंधित क्षेत्र

अकोला: मोठी उमरी, कौलखेड, गौरक्षण रोड, खडकी, मलकापूर प्रतिबंधित क्षेत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील दक्षिण आणि पूर्व झोनमध्ये कोविड संसर्गीत रुग्‍णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या झोनमध्ये येणाऱ्या परिसरातील मोठी उमरी, कौलखेड, गौरक्षण रोड परिसर, खडकी, मलकापूर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये पूर्व क्षेत्रातील अतिसंवेदनशील भाग म्‍हणून घोषित करण्‍यात आलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ता. २७ एप्रिल ते ८ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रातून वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाण्‍यास व बाहेरील व्‍यक्‍तींना प्रतिबंधित क्षेत्रास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आशा वर्कर आणि ए.एन.एम.च्‍या व्‍दारे सर्व्‍हेक्षणाचे काम करण्यात आले असून

हेही वाचा: दोन खासदार, सहा आमदार तरीही जनता बेजार!

, त्‍या भागातील सर्दी, ताप, खोकला व कोरोना सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. लक्षणे असलेल्‍या नागरिकांचे आणि कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांच्‍या जवळच्‍या संपर्कात असलेल्‍या नागरिकांची कोरोना चाचणी करण्‍यात येणार आहे. याचसोबत खासगी रुग्‍णालय व क्लिनिकमध्‍ये येणाऱ्या रुग्‍णांपैकी कोरोना सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या नागरिकांची माहिती सदर रुग्‍णालय व क्लिनिक यांनी मनपा प्रशासनास देणे बंधनकारक करण्‍यात आली आहे.

संपादन - विवेक मेतकर