Akola Crime News: कुख्यात गुंडास MPDAॲक्ट अन्वये एक वर्षाकरिता स्थानबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Crime News

Akola Crime News: कुख्यात गुंडास MPDAॲक्ट अन्वये एक वर्षाकरिता स्थानबद्ध

अकोला : भिम चौक, अकोट फैल येथे राहणारा कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे ( ३०) याला एमपीडीए ॲक्ट अन्वये एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले.

त्याच्या वर यापूर्वी गैर कायद्याची मंडळी सामील होवून घातक शस्त्रांनिशी दंगा करून लोकसेवक त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अटकाव, शिवीगाळ करणे, सार्वजनिक मालमत्तेस नुकसान करणे, सामाण्य लोकांना अश्लील शिवीगाळ करून जिवाने मरण्याची धमकी देणे, घातक शस्त्रांचा वापर करून गंभीर दुखापत करणे, घरामध्ये घुसुन मारहाण करणे,

इतरचे जिवीतास व सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृती करणे, सामन्य लोकांचे रस्ता अडवून त्यांना गैरनिरोध करून शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याचे वर विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती; परंतु तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवून पोलिस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता.

जिल्हादंडाधिकारी नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:चे स्त्रोताव्दारे माहिती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश ता. ९ जानेवारी २०२३ रोजी पारीत केला. कुख्यात गुंडाला जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.

ही कार्यवाही पूर्ण करण्याकरिता पोलिस अधीक्षक संदिप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग, अकोला, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पोलिस स्टेशन खदान येथील पोलिस निरीक्षक श्रीरंग सणस, महेंद्र कदम तसेच पोलिस स्टेशनमधिल कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले.