अकोला : परिमंडळात २६९ वीज चोरांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola electricity

अकोला : परिमंडळात २६९ वीज चोरांवर कारवाई

अकोला : अनधिकृत पणे वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज वापरणाऱ्या वीज चोरांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली आहे. पहिल्याच दिवशी अकोला परिमंडळात २६९ वीज चोरांवर कारवाई करून जोरदार दणका दिला. महावितरण कंपनीने केलेल्या कारवाईमुळे यंत्रणेवरील असलेला वीज जोडभार कमी झाला आहे. पहिल्याच दिवशी केलेल्या कारवाईत एकुण २.८३ मेगा वॅटने जोडभार कमी झाला आहे.

परिमंडळात अनेक वीज ग्राहक अनधिकृत वीज वापर करीत असल्याने विद्यमान यंत्रणेवरील दबाव वाढल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महावितरणकडून कठोर कारवाई करण्यात आली. वीज चोरांच्या विरोधात कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. यामुळे यंत्रणेवर पडणारा अतीरिक्त त्राण कमी होण्यास मदत होईल.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कारवाईच्या पहिल्या दिवशी अकोला जिल्ह्यात ९७, बुलडाणा जिल्ह्यात १५३ तर वाशीम जिल्ह्यात १९ ठिकाणी एकूण ४९ फिडरवर ही मोहीम राबविण्यात आली. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात सर्व फिडरवर ही मोहीम राबवून यंत्रणेवरील असलेला अतीरिक्त दाब कमी करण्यात येणार आहे. विजचोरी अजामीनपात्र तसेच दखलपात्र गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना कठोर शिक्षा झाल्याच्या घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. याकडे महावितरणने वीज ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

अशी केली कारवाई

बुलडाणा जिल्ह्यात १५३ ठिकाणी कारवाई केल्याने जिल्ह्यातील यंत्रणेवरील दाब १.९० मेगावॅटने कमी झाला आहे. अकोला जिल्ह्यात ९७ ठिकाणी कारवाई करून यंत्रणेवर असलेला दाब ०.३८ मेगावॉटने कमी करण्यात यश आले आहे.

Web Title: Akola Mseb Action Against 269 Power Thieves

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top