अकाेला : वीज जोडणीसाठी मीटरचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola MSEB light meters Shortage for electricity connection

अकाेला : वीज जोडणीसाठी मीटरचा तुटवडा

मालेगाव : नवीन वीज जोडणीसाठी लवकर मीटर मिळत नसल्यामुळे वीज चोरी वाढली आहे. कार्यालयात नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरूनही दोन-दोन महिने मीटरची वाट पाहावी लागत आहे. मात्र छुप्या मार्गाने चार-चार हजार रुपये घेऊन नवीन मीटर बसवून दिले जात आहे.सध्या नवीन वीज मीटर विक्रीचा धंदा जोरात सुरू आहे.

"अर्ज करा आणि मीटर घ्या"ही वीज वितरण कंपनीची घोषणा फोल ठरली आहे. नवीन कनेक्शनसाठी मीटर नसल्याच्या कारणावरून अनेक महिने कोटेशन भरून वीज जोडणीची वाट पाहावी मीटर लागत आहे.येथील वीज पारेषण कार्यालयात वीज मीटर नाहीत असे सांगितले जाते.मात्र चार हजार रुपये दिले की, ताबडतोब मीटर लावून दिले जात आहे.

मीटर विक्रीसाठी अनेक एजंट फिरत असल्याचे कोटेशनधारकातून बोलले जात आहे.वाशिम येथील एका खासगी वीज मीटर पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडून अशी पैसे उकळण्याची शक्कल लढवली जात आहे.नवीन वीज जोडणीसाठी प्रतिक्षा करणा-या ग्राहकांना शोधून, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने मीटर विकली जात असल्याचे ग्राहकातून बोलले जात आहे.

सुरवातीला मीटर विक्रीचा दर सोळाशे रुपये होता. आता मागणी वाढल्याने चार हजार रुपये करण्यत आला आहे. नवीन मीटरसाठी चार हजार रुपयांचा भुर्दंड नवीन वीज जोडणी करणा-या ग्राहकांवर पडत आहे. तेव्हा वीज पारेषण कंपनीने खाजगी वीज मीटर विक्रीच्या गोरखधंद्याला लगाम घालावा व भ्रष्टाचार थांबवावा.तसेच वीज पुरवठा करणाऱ्या एजन्सीची एजन्सी सुद्धा रद्द करावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

येथील उपअभियंता क्षिरसागर यांना आपल्या कार्यालयात नवीन वीज जोडणीसाठी किती अर्ज आहेत व वीज मीटर कधी मिळणार,बाहेरून मीटर आणण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली जात आहे असे विचारले असता; सध्या पन्नास ते साठ नवीन जोडणीसाठी अर्ज प्रलंबित आहेत. परंतु मिटर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना वीज पुरवठा करणे शक्य नाही.मात्र कार्यालयात मीटर प्राप्त होताच त्यांना नवीन मीटर देऊन वीज पुरवठा केला जाईल असे सांगितले आहे. तसेच कोणत्याही वीज ग्राहकांनी अव्वाच्या सव्वा पैसे देऊन मीटर खरेदी करु नये असेही आवाहन केले आहे.

ऑनलाईनचा फटका

विज मीटरसाठी विज वितरण कंपनीकडून ऑनलाईन अर्ज करण्याचे सांगीतले जाते. यासाठी ग्राहकाला सोळाशे रूपये मोजावे लागतात. यानंतर जोडणीचे पैसे भरावे लागतात. नंतर विकत घेतलेल्या याच मीटरचे भाडे विज वितरण कंपनीकडून वसूल केल्या जाते हा सर्वच व्यवहार अनाकलनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Web Title: Akola Mseb Light Meters Shortage For Electricity Connection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top