

Akola Municipal Corporation Gears Up for Civic Elections
Sakal
अकोला : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसेच निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नको, असे निर्देश आयुक्त डॉ.लहाने यांनी दिले.