अकोला : अर्धवट नाले सफाईने पुन्हा शहराची ‘तुंबापुरी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola municipal corporation incomplete drainage cleaning work

अकोला : अर्धवट नाले सफाईने पुन्हा शहराची ‘तुंबापुरी’

अकोला : नाले सफाईबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गुरुवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या पावसाने अकोला शहराची ‘तुंबापुरी’ झाली. अर्धवट नाले सफाईमुळे मुसळधार पावसाने नाले तुंबून घाण पाणी रस्त्यावर आले होते. ही घाण स्वच्छ करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

अकोला शहरातील २४९ नाल्यांपैकी २३३ नाल्यांची स्वच्छता करण्यात आल्याचा दावा मनपा प्रशासनाने आमदारांसोबत झालेल्या बैठकीत केला होता. हा दावा किती योग्य होता हे गुरुवारी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा सिद्ध केले. जे नाले स्वच्छ केल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता, तेच नाले काही तासात झालेल्या ९५.३ मि.मी. पावसाने तुटुंब भरून वाहत रस्त्यावर आले. त्यामुळे सर्वत्र घाण पाणी रस्त्यावरून वाहत होते. सकाळी नागरिकांना झोपेतून उठल्यानंतर दारात व अंगात घाण पाणी आणि चिखल बघावयास मिळाला.

नवीन अंडरपासमध्ये साचले पाणी

गांधी रोडवरून धिंग्रा चौक ते जनता भाजीबाजारापर्यंत तयार करण्यात आलेल्या भूमिगत रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने हा संपूर्ण अंतरपास पाण्याखाली गेल्याने या रस्त्याने वाहतुक बंद झाली आहे. अंडरपासमधून पाणी काढण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण पावसाळाभर हा रस्ता बंद राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग निधी विभागातर्फे या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

महामार्ग व रेल्वे पुलांखाली पाणी

अकोला शहरातील महामार्ग व रेल्वेच्या पुलांखाली गुरुवारी रात्रीच्या पावसाने पाणी साचले. त्यात उमरी रेल्वे पूल, शिवनी परिसरातील महामार्गाखालील पुलाचा समावेश आहे. पाणी साचल्याने येथून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत होते.

तापडियानगरातील नाला पुन्हा तुंबला

तापडियानगर व रामदासपेठमधून जाणारा मोठा नाला गुरुवारी रात्री पुन्हा तुंबला. या नाल्यात आवारभिंतीचा मलबा पडला असल्याने यापूर्वी संपूर्ण रस्त्यावर घाण पाणी साचले होते. त्यानंतर मनपातर्फे हा नाला स्वच्छ करण्यात आला. मात्र, अर्धवट स्वच्छतेने गुरुवारी रात्री पुन्हा नाल्याचे पाणी रस्त्यावर परिसरातील नागरिकांच्या घरात साचलेले बघवास मिळाले. त्यामुळे येथील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Akola Municipal Corporation Incomplete Drainage Cleaning Water On Roads

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top