
Akola Municipal Corporation
sakal
अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव नगरविकासकडून निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.