अकोला : जुनी वस्तीतील नागरिक पाणी टंंचाईने त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Murtijapur water scarcity Citizens Inconvenience

अकोला : जुनी वस्तीतील नागरिक पाणी टंंचाईने त्रस्त

मूर्तिजापूर : येथील नगरपरिषदेवर गत सहा महिन्यापासून प्रशासकाच्या हाती कारभार आहे. परंतु एक ते दीड महिन्यापासून नवीन प्रशासकांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडे प्रशारकासह डीपीओ या दोन्ही पदाचा प्रभार असल्यामुळे ते मूर्तिजापूरवासियांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहेत.

अशातच भर उन्हाळ्यात जुनी वस्तीमध्ये गत २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. येथील नागरिक पाण्याच्या समस्याचा सामना करत आहेत. परंतु, नगरपरिषदेचे प्रशासक व संबंधित पाणीपुरवठा यंत्रणा येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहे.

शहरातील अनेक हातपंप सुद्धा बंद आहेत, नळाला पाणी नाही, त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. भर उन्हातही नगरपरिषदेणे पाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ता. १ जूनपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा सुरु केल्यास शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महिलांचा घागर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रायुकाँचे शहराध्यक्ष शुभम मोहोड यांनी दिली. सोशल मीडियावर प्रसिद्धी घेणारे समाजसेवक फरार असून, त्यांनी वार्डातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे.

Web Title: Akola Municipal Corporation Water Scarcity Murtijapur Citizens Inconvenience

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top