BJP Emerges Dominant Across Multiple Municipalities
sakal
अकोला : जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांमध्ये भाजप धुरंधर ठरला आहे. अकोट,तेल्हारा,हिवरखेड व मूर्तिजापूर या चार नगरपरिषदांवर कमळ फुलले. तर काँग्रेसने बाळापूर आपला पारंपरिक गड राखण्यात यश मिळवले असून वंचित बहुजन आघाडीने बार्शीटाकळी नगरपंचायतीवर बाजी मारली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याने या पक्षांना निवडणूक निकालांनी धक्का दिला आहे.