Akola : महानगरपालिका निवडणूक हालचालींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Municipal Corporation

Akola : महानगरपालिका निवडणूक हालचालींना वेग

अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रभाग रचनेचे आदेश धडकल्यानंतर आता मतदार याद्या दुरुस्तीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ता. ३ व ४ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनियाहय आयोजित केले जाणार आहे.

आगामी काळात होवू घातलेल्‍या महानगरपालिका निवडणुकीकरिता ता. ०५ जानेवारी, २०२३ रोजीच्‍या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी ग्राह्य धरण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादीत नाव नसणे तसेच मय्यत, दुबार व स्‍थलांतरीत मतदारांची नावे कमी करणे आणि मतदारांचे नाव, फोटो, पत्‍ता तसेच सेक्‍शन ॲड्रेस दुरुस्‍त करण्‍याकरिता विशेष शिबिराचे आयोजन केले जात आहे.

राज्‍य निवडणूक आयोग यांचे प्राप्‍त आदेशानुसार ही कार्यवाही करण्‍यात येत आहे. भारत निवडणूक आयोग यांचे प्राप्‍त निर्देशानुसार कार्यवाही करण्‍याकरिता महानगरपालिकाव्दारा प्रभाग निहाय मतदार यादी पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्‍ती करण्‍यात आली.

आक्षेप घेणाऱ्या मतदारांनी त्‍यांचेकडे त्‍यांचे नाव मतदार यादी नाव नसलेल्‍या नागरीकांनी नमुना क्र. ६, मय्यत, दुबार व स्‍थलांतरीत मतदारांची नावे कमी करणेकरीता नमुना क्र. ७ व मतदारांचे नाव, फोटो, पत्‍ता तसेच सेक्‍शन ॲड्रेस दुरुस्‍त करण्‍याकरिता नमुना क्र. ८ भरुन द्यावा किंवा विशेष शिबिराचे दिवशी संबंधित मतदान केंद्रावर स्‍वतः उपस्थित राहून माहिती भरुन द्यावी. याबाबत मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी आवाहन केले आहे.