Akola municipal election, BJP NCP seat sharing
esakal
श्रीकांत राऊत
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. युतीतील काही जागांवर अजूनही मतभेद कायम असल्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याने युतीबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे.