
अकोला मनपा निवडणुकीसाठी भाजपचे मिशन ‘६३ प्लस’
अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीकरिता भाजपचे प्रभारी म्हणून आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहे. सध्या भाजपमध्ये सावरकरांची एकहाती ‘सत्ता’ असल्याचे मानले जात आहे. आता त्यांच्याच नेतृत्वात भाजपने आगामी निवडणुकीत ‘मिशन ६३ प्लस’ वर काम सुरू केले आहे. त्यामुळे माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या गटाला यावेळीही निवडणुकीपासून लांबच राहवे लागणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या राज्यभरातील प्रभारींची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अकोला महानगरपालिकेचे प्रभारी म्हणून अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाने जवाबदारी देत पक्षाने जो विश्वास दाखवला आहे त्याकरता सर्व ज्येष्ठ नेत्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.(Akola Municipal Election BJP mission)
पक्षाने निवडणुकीची जबाबदारी सोपविताच ते कामाला लागले आहेत. अकोला महापालिकेत ‘६३ प्ल’ नगरसेवक निवडून येत एक हाती सत्ता स्थापन करण्याकरता कार्य करू अशी ग्वाही या निमित्ताने त्यांनी दिली आहे. महानगरपालिका निवडणूक संदर्भात कोर कमिटीची बैठक त्यांनी घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल होते तर संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, संघटन मंत्री सुनील कर्जतकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महापौर अर्चनाताई मसने, माजी महानगराध्यक्ष किशोर पाटील, माधव मानकर अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, संजय गोडफोडे, श्रावण इंगळे, जयश्री फुंडकर हरिनारायण माकोडे , मोनालीताई गावंडे, राजू उगले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोला महानगरपालिका निवडणूक प्रमुख जबाबदारी आमदार रणधीर सावरकर यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी या बैठकीत दिली. कार्यक्रमाचे संचालन ॲड. देवाशीष काकड तर आभार प्रदर्शन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
Web Title: Akola Municipal Election Bjp Mission 63 Plus
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..