Seat Sharing Dispute: BJP vs Shinde Sena
अकोला
Akola Elections : अकोल्यात भाजप-शिंदेसेना युती फिस्कटण्याची शक्यता; जागावाटपाचा तिढा!
Alliance Drama : अकोलच्या महापालिका निवडणुकीत भाजप‑शिंदेसेना युती जागावाटपावर तणावामुळे फिस्कटण्याची शक्यता वाढली आहे. राष्ट्रवादीशी एकमत असूनही मुख्य युती भागीदारांमध्ये मतभेद स्पष्ट दिसत आहेत.
श्रीकांत राऊत
अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युती अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यामुळे ही युती फिस्कटण्याची शक्यता आता बळावू लागली आहे. वरवर सकारात्मक वातावरण असले, तरी स्थानिक नेत्यांमध्ये मात्र संभ्रमावस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. शुक्रवारी (ता.२६) झालेल्या बैठकीत भाजपने ठेवलेला जागावाटपाचा फॉर्म्युला शिंदेसेनेला मान्य नसल्याने बैठक निष्फळ ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.
