
अकाेला : सावधान ! येतो आहे बुलडोझर !!
मूर्तिजापूर : तालुक्यातीच्या ग्रामीण व शहरी भागातील गायरान (ई-क्लास) जमिनीवरील अतिक्रमणधारकांनी तात्काळ अतिक्रमणे काढून घ्यावी, अन्यथा या जागांवर बिहार पॕटर्न प्रमाणे वृक्षारोपण करावयाचे असल्यामुळे सर्व अतिक्रमणे निष्काषीत करण्यात येतील, असा इशारा येथील महसूल प्रशासनाने दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या ता. २४ एप्रिलच्या निर्देशानुसार या तालुक्यामधील ई-क्लास जमिनींवरील अतिक्रमणे तत्काळ काढण्याबाबतची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
सदर ई-क्लास जमिनींवर येत्या मॉन्सूनपूर्वी बिहार पॕटर्न राबवून वृक्ष लागवड केली जाणार आहे. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील शासकीय धान्य गोदामात सर्व संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तहसीलदार प्रदीप पवार मूर्तिजापूर, बीडीओ बायस, सर्व संबंधित विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक या बैठकीला उपस्थित होते. शासन निर्णय ता. १२ जुलै २०११ तसेच शासन परिपत्रक ता. ७ सप्टेंबर २०१० प्रमाणे ग्रामीण व नागरी भागातील शासकीय गायरान जमिनीवर झालेली अतिक्रमणे ता.१० मे २०२२ पर्यंत निष्काशीत करावयाची आहेत, असे निर्देश या सभेत उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी दिले.
नियमाप्रमाणे अतिक्रमण काढण्याच्या नोटीसेस अतिक्रमणधारकांना बजावल्यानंतर त्यांनी अतिक्रमण न हटविल्यास तत्काळ शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल. अतिक्रमण निष्काशीत केल्यानंतर सर्व गायरान जमिनींवर बिहार पॅटर्न प्रमाणे वृक्ष लागवड करण्याबाबबतचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणेला दिले.
-अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर.
Web Title: Akola Murtijapur Gyran Land Encroachments Bulldozer Bihar Pattern
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..