
Akola News
sakal
जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत नुकतीच निघाली. यात अनेकांना धक्का बसला. येथील अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव आहे. गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी पुरुष उमेदवार दावेदार ठरणार होते. राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळे भाजपला जिल्हा परिषद हातात ठेवणे आवश्यक आहे. अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक होते. मात्र, आरक्षणाच्या सोडतीत अनेकांचे गट आरक्षित झाल्याने त्यांच्यासमोर आता कुठून लढावे, असा प्रश्न आहे.