अरे हे काय! अवघ्या 40 हजार रुपयांसाठीच जन्मदात्याने लावला 14 वर्षीय मुलीचा विवाह

akola nandura news The mother arranged the marriage of a 14-year-old girl for just Rs 40,000
akola nandura news The mother arranged the marriage of a 14-year-old girl for just Rs 40,000

नांदुरा (जि.बुलडाणा) ः लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो.

भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.

काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जाते, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जातात

अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात समोर आली आहे. तालुक्यातील ग्राम डिघी येथील विठ्ठल ज्ञानदेव भंगाळे याने चारठाणा येथील शेतमजुर राजु दिपा वरखेडे (कोळी) यांचेशी संपर्क करून त्यांची राधा नामक मुलीशी लग्न लाऊन देण्यासाठी ४० हजार रूपयाची ऑफर दिली असता त्याने कुटुंबीयांचे विरूध्द जाऊन पैसे घेऊन धुपेश्वर येथे आपल्या मुलीचा कथाकथीत बेकायदेशीर बालविवाह लाऊन मुलीला जबरदस्तीने तिच्या मर्जीविरूध्द पाठवुन दिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या प्रकरणी प्रथम मुक्ताईनगर जिल्हा जळगांव येथे दाखल तक्रारी वरून नांदुरा रेफर झालेल्या नुसार विठ्ठल ज्ञानदेव भंगाळे अधिक २ आरोपी विरूध्द गुन्हा करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, ग्राम चारठाणा (ता. मुक्ताईनगर ) येथील १४ वर्षिय शालेय विध्यार्थीनी राधा राजु कोळी हिने जळगांव (खा) येथील जिल्हापेठ पोलिस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारी नुसार तिचे शिक्षण माध्यमिक शाळा, चारठाणा येथे सुरू असतांना वडील राजु दिपा कोळी यांनी डिघी (ता. नांदुरा) येथील ३३ वर्षीय विठ्ठल ज्ञानदेव भंगाळे याचे जवळुन ४० हजार रूपये घेऊन त्याचेशी माझे लग्न लाऊन देण्याचे ठरविले.

माझे मर्जीविरूध्द होणार्‍या या लग्नास मी तयार नव्हती तसेच माझ्या मोठ्या दोन विवाहीत बहिणी, डोळ्यानी अधु असलेली आई निर्मलाबाई राजु कोळी, भाऊ गोपाल राजु कोळी, या सर्वांचा विरोध असतांना वडिलांनी कुणाचे काहिही म्हणणे ऐकून न घेता मला व आईला मारहान करीत जबरदस्तीने 13 मे रोजी श्री धुपेश्वर मंदिर येथे नेऊन तेथे काही व्यक्तीसोबत उपस्थित असलेल्या विठ्ठल ज्ञानदेव भंगाळे सोबत लग्न लाऊन त्याचे सोबत मला पाठऊन दिले. दरम्यान विठ्ठल भंगाळे याने धाकदपट करून शारिरीक संबध केले.

७ जुन रोजी एका तेरवी निमित्य आईवडिलांचे घरी चारठाणा येथे आली असता आई व बहिणीला सांगितले की, मला येथे डिघी पाठऊ नका. मी आत्महत्या करू नये म्हणुन वडिलांचे न कळत सर्वांनी मला आईचे मामा तुकाराम कांडेलकर (रा. दुधलगांव) येथे सुरक्षेसाठी पाठविले होते.

पण माझे वडिलांना समजताच पुन्हा मारहान करून डिघी येथील विठ्ठल भंगाळे याचे स्वाधीन केले होते. शेवटी २६ जून रोजी संधी साधुन एकटीच जळगांव (खा) पोहोचली.

माझी व्यथा ऐकुन मला समाजसेविने दिलेल्या सल्यानुसार जळगांव (खा) पो.स्टे. येथे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून प्रथम मुक्ताईनगर नंतर नांदुरा पो.स्टे. येथे प्रकरण वर्ग करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी कलम ३७६ ,२ ,आय, ३७६, ३७०, ३२३ सह कलम १२ बाललैंगिक अत्याचार २०१२ सहकलम ९,१०,११ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००७ प्रमाणे पीडित मुलीचे तक्रारीवरून आरोपी राजु दिपा वरखेडे (कोळी) (वय४३, रा. चारठाणा) विठ्ठल ज्ञानदेव भंगाळे (वय ३३ रा. दिघी, ता. नांदुरा), दिलीप धनराज जाधव (वय २१) यांचे विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com