हे भयानक आहे: एकच रुग्णवाहिकेत कोंबले 12 कोरोना संशयित

मनोज भिवगडे
Saturday, 5 September 2020

एकच रुग्णवाहिकेत १२ कोरोना संशयित रुग्ण नेल्याचा प्रकार लाखनवाडा येथे घडला. येथे आणखी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना शोधून १०८ रुग्णवाहिकेमधून या १२ जणांना कोंबून नेण्यात आले.

अकोला : एकच रुग्णवाहिकेत १२ कोरोना संशयित रुग्ण नेल्याचा प्रकार लाखनवाडा येथे घडला. येथे आणखी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना शोधून १०८ रुग्णवाहिकेमधून या १२ जणांना कोंबून नेण्यात आले.

जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालता फिरत असाल, आणि एखाद्या व्यक्तीपासून शारीरिक अंतर पाळले असेल तर तुमच्या शरीरात करोनाचा विषाणू शिरकाव करणार नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर सावधान...! करोनाचा हा घातक विषाणू हवेमार्फत देखील पसरू शकतो असे जगभरातील शेकडो शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे स्पष्ट केले आहे. नोवेल करोना विषाणूचे छोटेछोटे कण हवेत देखील जिवंत राहतात आणि त्याचा देखील लोकांना संसर्ग होऊ शकतो असे एकूण ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांना आपल्या संधोधनात आढळून आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मात्र, एकच रुग्णवाहिकेत १२ कोरोना संशयित रुग्ण नेल्याचा प्रकार लाखनवाडा येथे घडला. येथे आणखी आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना शोधून १०८ रुग्णवाहिकेमधून या १२ जणांना कोंबून नेण्यात आले.

लाखनवाडा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. विनोद जाधव, अटाळी पीएससीचे आरोग्य सेवक खरात व इतर सहकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक बेलोकार, तलाठी नगराळे व इतर अधिकारी उपस्थित असताना शासनाने दिलेल्या गाइडलाइन्सचे उल्लंघन करण्यात आले. संबंधित संशयित रुग्णांनी विरोध दर्शवल्यानंतरही एकाच गाडीत त्यांना घेवून गेले. रुग्णवाहिकेच्या चालकाला पीपीई किट नव्हती. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी गावकऱ्यांची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 12 corona suspects in a single ambulance