esakal | जॉइंट ॲग्रोस्को’मध्ये १८३ शिफारसींना मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: 183 recommendations approved in Joint Agrosco

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ४८ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचा (ऑनलाइन) समारोप शनिवारी (ता.३१) झाला.

जॉइंट ॲग्रोस्को’मध्ये १८३ शिफारसींना मान्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ४८ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचा (ऑनलाइन) समारोप शनिवारी (ता.३१) झाला.

या राज्यस्तरीय बैठकीत चारही कृषी विद्यापठांनी सादर केलेल्या २०८ शिफारसींपैकी ११ पीक वाण, आठ यंत्रे-अवजारे व १६४ पीक उत्पादन तंत्रज्ञान, अशा एकूण १८३ शिफारसींना मान्यता मिळाली असून, आता त्या राज्यभरात प्रसारीत केल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कृषी विद्यापीठाकडे चक्राकार पद्धतीने या महत्त्वाकांक्षी सभेचे यजमानपद यंदा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे असून पाच दिवस चाललेल्या कृषीच्या या महाकुंभात राज्यांतर्गत तथा देशपातळीवर विविध पिक वाणे, यंत्रे-अवजारे तथा संशोधनात्मक शिफारसी व तंत्रज्ञान सादरीकरण चर्चा करण्यात आली. यावर्षी चारही कृषी विद्यापीठांमधून एकूण २०८ शिफारसी (१६ पीक वाण, १२ यंत्रे व अवजारे, १८० पीक उत्पादन तंत्रज्ञान) या बैठकीमध्ये सादर झाल्या. यापैकी एकूण १८३ शिफारसी मान्य करण्यात आल्या.


‘जॉइंट ॲग्रोस्को’मध्ये मंजूर शिफारशी
शेती पीक व पीक सुधारणा धोरण, नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन : पीक उत्पादन तंत्रज्ञान, उद्यानविद्या, पशु व मत्स्य विज्ञान, मुलभुत शास्त्र अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान, पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्रे, शेती पिके वाण प्रसारण समिती, उद्यानविद्या पिक वाण प्रसारण समिती, कृषी यंत्रे औजारे प्रसारण समिती, अजैविक आणि जैविक ताण व्यवस्थापन नोंदणी प्रस्ताव व अपयुक्त सुक्ष्मजीव समितीद्वारे सादर केलेल्या एकूण २०८ शिफारसींपैकी १८३ शिफारसींना मान्यता देण्यात आली असून, या शिफारसी आता राज्यभर शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या जाणार आहेत.


‘डॉ.पंदेकृवि’च्या या शिफारसींना मान्यता
पीडीकेव्ही साकोली रेडराईस-१ (धाण), टीएजी ७३ (भुईमूग), पीडीकेव्ही ऋतुजा (चवळी) या पीक वाणांना, पीडीकेव्ही लाखोळी दालमील प्लॅट, पीडीकेव्ही जैवउष्णवायू चक्राकार वाळवणी यंत्र या यंत्रांना व उत्पादन तंत्रज्ञान अंतर्गत ३३, अशा एकूण ३८ शिफारसींना मान्यता मिळाली आहे. गेल्यावर्षी ३३ शिफारसींना मिळाली होती.

(संपादन - विवेक मेतकर)