esakal | प्रवाशांसाठी रेल्वेकडून ३ अतिरिक्त विशेष गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: 3 additional special trains for passengers

कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे थांबेल्या पुन्हा रुळावरू येऊ लागल्या आहेत. अकोला, शेगावमार्गे प्रवाश करणाऱ्या प्रवाशांसाठी भुसावळ विभागात तीन विशेष गाड्यांची सेवा उद्यापासून (ता.१२) मिळणार आहे. यात गाडी क्रमांक ०२८४३ अप खुर्दा रोड ते अहमदबाद या विशेष गाडीचा समावेश आहे.

प्रवाशांसाठी रेल्वेकडून ३ अतिरिक्त विशेष गाड्या

sakal_logo
By
संजय सोनोने

शेगाव (जि. बुलडाणा)  ः कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे थांबेल्या पुन्हा रुळावरू येऊ लागल्या आहेत. अकोला, शेगावमार्गे प्रवाश करणाऱ्या प्रवाशांसाठी भुसावळ विभागात तीन विशेष गाड्यांची सेवा उद्यापासून (ता.१२) मिळणार आहे. यात गाडी क्रमांक ०२८४३ अप खुर्दा रोड ते अहमदबाद या विशेष गाडीचा समावेश आहे.

ही गाडी आठवड्यात दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार धावणार आहे. या गाडीला विदर्भात बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी नागपूर , वर्धा , बडनेरा अकोला, नादुरा, मलकापूर येथे थांबा आहे. ही गाडी अकोला येथे सायंकाळी ६.२५ तर नांदुरा येथे ७.२५ आणि मलकापूर येथे ७.४० वाजता पोहोचेल. हा गाडी परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक- ०२८४४ डाऊन अहमदाबाद - खुर्दा १४ सप्टेंबरपासून धावणार आहे. दर सोमवार, गुरुवार, रविवार, शनिवार रोजी प्रस्थान करेल. या गाडीला विदर्भात मंगळवार , शुक्रवार , रविवार, सोमवारी मलकापूर येथे सकाळी ५.२०, नांदुरा येथे ५.४७, अकोला येथे ०६.३५, बडनेरा येथे ८.०५ ला पोहोचणार आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

खुर्दा रोड ते ओखा ही दुसरी विशेष गाडी १३ सप्टेंबरपासून दर रविवारी धावणार आहे. ही गाडी सोमवारी अकोला येथे दुपारी २.१० शेगाव येथे २.४३ तर मलकापूर येथे दुपारी ३.२३ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १६ सप्टेंबरपासून दर बुधवारी धावणार आहे. या गाडीला गुरुवारी मलकापूर येथे सायंकाळी सकाळी ५.२० शेगाव ६.६, अकोला ०६.३५ व बडनेरा येथे ७.५७ वाजता थांबा असेल.


खुर्दा रोड ते गांधीधाम ही दिसरी विशेष गाडी १९ सप्टेंबरपासून दर शनिवारी धावणार असून, रविवारी नागपूर, वर्धा, बडनेरा (सकाळी ११.२०), अकोला (१२.१९), मलकापूर (दुपारी १.२१) वाजता थांबणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवारी धावणार असून, गुरुवारी मलकापूर येथे दुपारी ३.३३, अकोला येथे दुपारी ४.४०, बडनेरा येथे सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)