
आरटीई कोट्यातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु अद्याप ५६४ जागा रिक्त असल्याने प्रवेशासाठी पालक निरूत्साही असल्याचे दिसून येत आहे.
अकोला : आरटीई कोट्यातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु अद्याप ५६४ जागा रिक्त असल्याने प्रवेशासाठी पालक निरूत्साही असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती.
अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत.
दरम्यान यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप साडेपाचशेवर जागा रिक्तच आहेत.
अशी आहे आरटीईची स्थिती
- आरटीई साठी नोंदणी करणाऱ्या शाळा - २०१
- एकूण जागा - २३२३
- निश्चित प्रवेश - १७५९
- तात्पुरते प्रवेश - १२१०
- अद्याप रिक्त जागा - ५६४
(संपादन - विवेक मेतकर)