60 वर्षीय वृद्धाने 22 वर्षीय युवतीस पळविले

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 7 October 2020

एका २२ वर्षीय युवतीला ६० वर्षीय वृद्धाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध सोमवारी (ता.५) गुन्हा दाखल केला आहे.

मोताळा (जि.बुलडाणा),  : एका २२ वर्षीय युवतीला ६० वर्षीय वृद्धाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध सोमवारी (ता.५) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील २२ वर्षीय युवतीला मानेजवळ गाठ झाली होती. तिची उपचाराच्या अनुषंगाने तरवाडी येथील भास्कर जरीमल इंगळे (६०) याच्याशी ओळख झाली. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास आरोपी भास्कर जरीमल इंगळे याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून शेंबा येथून पळवून नेले,

अशी तक्रार संबंधीत युवतीच्या वडिलांनी बोराखेडी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भास्कर जरीमल इंगळे याच्याविरुद्ध कलम ३६३, ३६६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल जंजाळ, पोकाँ मंगेश पाटील करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: A 60-year-old man run away with a 22-year-old girl