esakal | लज्जास्पद! 72 वर्षीय आरोपीने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून केला विनयभंग
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: A 72-year-old man called an eight-year-old girl at his house in Akot आरोपीची तुरुंगात रवानगी

अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल प्रकरणातील आरोपी ७२ वर्षीय राहणार देशमुख प्लॉट अकोट याने एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरांमध्ये बोलवून विनयभंग केल्याप्रकरणी अकोट सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी २३ डिसेंबर २०२० पर्यंत अकोला कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

लज्जास्पद! 72 वर्षीय आरोपीने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून केला विनयभंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोट (जि.अकोला) :  अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल प्रकरणातील आरोपी ७२ वर्षीय राहणार देशमुख प्लॉट अकोट याने एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरांमध्ये बोलवून विनयभंग केल्याप्रकरणी अकोट सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी २३ डिसेंबर २०२० पर्यंत अकोला कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.


या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी विद्यमान कोर्टात सांगितले की, ९ डिसेंबर २०२० रोजी अकोट शहर पोलिस स्टेशनला पीडित मुलीचे आईने या आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पीडित मुलीचे आई-वडील मजुरीसाठी कामाला गेले होते.

आरोपी हा त्यांच्या शेजारी एकटाच राहतो. फिर्यादी सायंकाळी सहा वाजता कामावरून घरी परत आली असता, शेजारी राहणाऱ्या आजीने सांगितले की ७२ वर्षीय आरोपी याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास तीच्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरात बोलावून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

म्हणून फिर्यादी आईने पीडित मुलीस विचारले असता तिने सांगितले की, समोरच्या घरासमोर खेळत असताना आरोपीने आवाज देऊन घरात बोलावले व विनयभंग केला. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केले असता शेजाऱ्यांनी तिला घरी नेऊन सोडले.

आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीवर विवस्त्र करण्याच्या उद्देशाने घरात बोलून तिचा विनयभंग केला अशी फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध भादवि कलम ३५४ (अ)(ब) व कलम ७,८,१२ पोस्को गुन्हा क्रमांक ७६५/२० दाखल करण्यात आला, व आरोपीला १० डिसेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली. पुढील तपास करण्याकरिता आरोपीला २३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image