दहा वर्षीय मतीमंद मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार

प्रा.अविनाश बेलाडकर 
Friday, 28 August 2020

या तालुक्यातील खांदला येथील अल्पवयीन मतीमंद मुलीवर दोन वर्षांपूर्वी अत्याचार करून फरार झालेल्या मुख्य आरोपीस आज येथील ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : या तालुक्यातील खांदला येथील अल्पवयीन मतीमंद मुलीवर दोन वर्षांपूर्वी अत्याचार करून फरार झालेल्या मुख्य आरोपीस आज येथील ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज अटक करण्यात आलेल्या प्रवीण उर्फ तुकाराम कपूरचंद चव्हाण (२४) याने बाजूला राहाणाऱ्या १० वर्षे वयाच्या मतीमंद मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यानंतर या गुन्ह्यातील खांदल्याचेच गणपत सोळंके व दीपाली उर्फ कली गोपाल पवार या दोघा आरोपींसह पीडित मुलीला यवतमाळच्या कुठलीही डिग्री नसलेल्या डॉ.दयाल चव्हाणच्या दवाखान्यात नेऊन तिचा गर्भपात केला होता. १८ जून २०१८ ला या घटनेची तक्रार झाली होती. गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील तीन आरोपींना अटक केली होती. मुख्य आरोपी आजपर्यंत फरार होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक व उप विभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान ठाणेदार रहीम शेख यांच्या नियोजनात हेकॉ श्रीकांत बोरोकार, सुभाष उघडे, कॉ. आनिल आहेरवाल, स्वप्निल फाळके यांनी मुख्य आरोपीला शिताफीने खांदल्यातील त्यांच्या घरातून जेरबंद केले. न्यालयालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Accused absconding after torturing a 10-year-old mentally retarded girl