अडत व्यवसायिकाचे सव्वा लाख रुपये हिसकावले

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 22 December 2020

अज्ञात तीन अनोळखी इसमानी अडत व्यवसायिकाचे सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे १७ डिसेंबरच्या रात्री दहा वाजताचे दरम्यान घडली.

मंगरुळपीर (जि.वाशीम) ः अज्ञात तीन अनोळखी इसमानी अडत व्यवसायिकाचे सव्वा लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे १७ डिसेंबरच्या रात्री दहा वाजताचे दरम्यान घडली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रभुसा डगवार वय ६४, रा. पिंपळखुटा यांनी पोलिसांत तक्रार दिली की, १७ डिसेंबरचे रात्री फिर्यादी हे रामराव मैनकार यांचे सोबत कृषी उत्पन्न बाजार समिती येथून दुचाकी क्रमांक एम.एच. ३७ क्यू ०४८९ ने पिंपळखुटा येथे जात असताना रात्री सव्वा दहा वाजताचे सुमारास चांभई गौरक्षण ते पिंपळखुटा या रस्त्यावर अज्ञात तीन अनोळखी इसमानी फिर्यादी जवळील सव्वा लाख रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावली व पळून गेले.

अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९४, ३४ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय तुषार जाधव करीत आहेत.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे, ठाणेदार धनंजय जगदाळे, एपीआय तुषार जाधव व कर्मचारी हे या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Adat businessman snatched Rs