
केंद्र शासनाने संसदेत नुकतीच शेतकऱ्यांबाबत तीन विधेयके मंजूर केली आहेत. ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याने याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यात रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या विधेयकांच्या प्रतिची कार्यकर्त्यांनी होळी केली.
कृषी विधेयकांविरोधात अर्धनग्न आंदोलन, अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात विधेयकाची होळी
अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच शेतकऱ्यांबाबत तीन विधेयके मंजूर केली आहेत. ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याने याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यात रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या विधेयकांच्या प्रतिची कार्यकर्त्यांनी होळी केली.
अकोल्यात निंबा फाटावर होळी
अकोला जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात निंबा फाटा येथे सभा घेत होळी करण्यात आली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला शेतकऱ्यांना बांधण्याचे काम हे केंद्र सरकार करीत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरू शकत नाही.
त्यासाठी देशभर आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांनी दिली. यानंतर खुमकर यांनी विधेयकांची होळी केली. यावेळी पंकज दुतंडे, विष्णू निर्मल, रवी क्षीरसागर, प्रवीण दामोदर, साबिर शहा, सचिन दामोदर, विकास दामोदर, गजानन मोळक, मंगेश राठोड, सचिन निर्मळ, अजय दामोदर, राजू प्रधान, गणेश भटकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बुलडाण्यात तुपकरांनी केली होळी
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधात तीन विधेयके संसदेत पारीत केली आहेत. या कायद्याला विरोध म्हणून बुलडाणा जिल्ह्यात सावळा फाटा येथे शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. तुपकर व कार्यकर्त्यांनी या तिनही बिलांची होळी केली. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातुन पळ काढीत आहे. शेतकऱ्यांना कॉरिटच्या दारात उभे करीत असल्याचा आरोप तुपकर यांनी यावेळी केला.
वाशीममध्ये अर्धनग्न आंदोलन
वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात अर्धनग्न आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र येत शेतकरी विरोधी बिलाची होळी केली. यावेळी बालाजी मोरे, विशाल गोटे , गोपाल भिसाडे, विनोद भिसाडे,
निलेश थोरात ,राहुल धामणे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(संपादन - विवेक मेतकर)
Web Title: Akola News Agitations Against Central Government Bills Holi Akola Washim Buldhana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..