चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाची पुरात झुंज, काटेपूर्णा नदीपात्रात वाहून जाणारे दोघेही बापलेक सुखरुप

प्रदीप गावंडे
Tuesday, 22 September 2020

काटेपूर्णा नदीला आलेला पूर बघता तोल जाऊन दोन वर्षांच्या चिमुकल्यासह बाप नदी पात्रात पडला. मात्र चिमुकल्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यासोबत झुंज देत त्याने झाडांच्या फांद्यांचा आधार घेतला. अखेर गावकरी मदतीला धावून आल्याने बापलेकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

पिंजर (जि.अकोला) : काटेपूर्णा नदीला आलेला पूर बघता तोल जाऊन दोन वर्षांच्या चिमुकल्यासह बाप नदी पात्रात पडला. मात्र चिमुकल्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यासोबत झुंज देत त्याने झाडांच्या फांद्यांचा आधार घेतला. अखेर गावकरी मदतीला धावून आल्याने बापलेकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

जिल्ह्यातील पिंजर ते बार्शीटाकळी रोडवरील दोनद नजिक सोमवारी ही घटना घडली. कारंजा लाड येथील मंगळवारपेठेतील रहिवाशी नाशिर खान हा ३५ वर्षांचा तरूण पत्नी व तीन वर्षांचा चिमुकला यासिर खान यांच्यासह कारंजा येथून अकोल्याकडे दुचाकीने येत होता. त्याच वेळी काटेपूर्णा धरणाचे पाणी सोडल्याने दोनद जवळ नदी दुथडी भरुन वाहत होती. पुलावरून पाणी पाहण्यासाठी सलमान थांबला.

अकोाला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यावेळी त्याने मुलाला आपल्या पोटाशी दुप्पट्याने बांधून ठेवले होते. पाणी पाहत असताना त्याचा नदीत तोल गेला. बघताबघता दोघेही बापलेक वाहू लागले. ते बघून उपस्थित नागरिकांनी आणि नाशिरच्या पत्नीने आरडाओरडा सुरू केली. ते ऐकून दोनद येथील काही नागरिक धाऊन आले.

दोन येथील भारत ढिसाळे, शिवम अनारसे, युवराज सुर्वे, गणेश नारायण नागे, वैभव मनोहर प्रधान, भिकाजी उजवणे, संतोष कदम यांनी बापलेकाला वाचविण्यासाठी नदी पात्रात उड्या घेतल्या. पुलापासून ५०० मीटर अंतरावर वाहत गेल्यावर नदीच्या काठी झाडाला पकडत नाशीर मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होता.

गावकऱ्यांनी वेळीच मदत करून बाप लेकांना सुखरुप बाहेर आणले. तोपर्यंत पोलिसांना घटनेची माहिती मिळाली होती. पोलिस ताफा पोहोचण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बापलेकांना सुखरूप बाहेर काठले. पोलिस ताफा पोहोचल्यानंतर ठाणेदार शैलेंद्र ठाकरे यांनी त्यांना पिंजर येथे आणले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. दोघेही सुखरुप असल्याने त्यांना नातेवाईकांकडे सोपवले.

देव तारी त्याला कोण मारी!
असे म्हणात की , देव तारी त्याल कोण मारी... या म्हणीचा प्रत्यय सोमवारी दोनद येथे आला. काटेपूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्यानंतरही बापलेक सुखरूप बाहेर आलेत. दोनद येथील ग्रामस्थ नाशिर खान व त्याच्या तीन वर्षाच्या चिमुकल्यासाठी देवासारखे धावून आलेत.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Fathers flood struggle to save Chimukalya, Baplek safe in Katepurna river basin