मनपा निवृत्त कर्मचारी संघर्ष समितीचे आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 24 October 2020

प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर अकोला महानगर पालिका कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ताला ठोको, जेल भरो व आत्मदहनाचा इशारा मनपा प्रशासनाला देण्यात आला आहे.
 

अकोला : प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी महापालिकेसमोर अकोला महानगर पालिका कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ताला ठोको, जेल भरो व आत्मदहनाचा इशारा मनपा प्रशासनाला देण्यात आला आहे.

महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या दोन महिन्यापासून सतत सहाव्या वेतन आयोगाचे शिफारशीनुसार फरकाची रक्कम मिळावी, रजारोखीकरणाची रक्कम, अनुकंपतत्त्वावर नियुक्ती करणे व जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर पगारातून इंट्रिमेंटची रक्कम कपात करणे थांबवावे, कालबद्ध पदोन्नत्ती मिळावी आदी मागण्याबाबत अकोला महानगरपालिका कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांची गेट मिटिंग सुरू होती.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Agitations of Municipal Corporation Retired Employees Struggle Committee