esakal | जड वाहतुकीने रस्त्यांची ‘वाट’!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Bad condition of Anjani Khurd to Shivni Pisa road

महामार्गाच्या बांधणीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणारे ट्रक, कंटेनरने ग्रामीण भागील रस्त्यांची पार ‘वाट’ लावली आहे. त्यात अंजनीखुर्द ते शिवणीपिसा या पाच किलो मीटर रस्त्याचाही समावेश आहे. सातत्याने होत असलेल्या जड वाहतुकीचा भार आता ग्रामीण भागातील जिल्हा व राज्य मार्गांना सहन होताना दिसत नाही.

जड वाहतुकीने रस्त्यांची ‘वाट’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

सुलतानपूर / अकोला : महामार्गाच्या बांधणीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणारे ट्रक, कंटेनरने ग्रामीण भागील रस्त्यांची पार ‘वाट’ लावली आहे. त्यात अंजनीखुर्द ते शिवणीपिसा या पाच किलो मीटर रस्त्याचाही समावेश आहे. सातत्याने होत असलेल्या जड वाहतुकीचा भार आता ग्रामीण भागातील जिल्हा व राज्य मार्गांना सहन होताना दिसत नाही.


शिवणी पिसा येथील नागरिकांना तालुका मुख्यालय व इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी राज्य महामार्गावरील अंजनीखुर्द वरुनच मुख्यमार्ग आहे. शिवणी पिसा गावाजवळून समृध्दी महामार्ग गेला असल्याने या महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे सिमेंट , मुरुम गिट्टी व इतर जड साहित्य अंजनीखुर्द ते शिवणी पिसा या मार्गाने नेले जाते. पंतप्रधान ग्रामसडक योजने अंर्तगत बनविलेल्या पाच किलो मीटरच्या या रस्त्यावरून होणारी जड वाहनांनव्दारे होणारी साहित्य वाहतूक व सततची वरदळ यामुळे रस्त्या पूर्ण खराब झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

रस्‍त्यावर साचले गटार
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पाणी साचल्याने गटार तयार झाले आहेत. त्यामुळे शिवणी पिसा ग्रामस्थांना या रस्त्यावरून वाहणांव्दारे ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी बऱ्याच वेळा रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक किरकोळ व जिव घेणे अपघात सुध्दा झाले आहे. संबंधित कंत्राटदारांनी वेळीच लक्ष घालून या रस्त्याची देखभाल व दुरस्ती करण्याची मागणी होत होत आहे.
 
यंत्रणा जबाबदारी घेणार का?
मोठ्या वाहनांमधून दिवसभरामध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या जड साहित्यांची या रस्त्यावरून वाहतूक केली जाते. मात्र ग्रामीण भागातील या रस्त्याची मजबुतीची क्षमता राज्य महामार्गाएवढी नसल्याने जड वाहनांनच्या भारामुळे हे रस्ते उखडून खड्डे पडतात. त्यामुळे संबंधित यंत्रनेने या रसत्याची जबाबदारी घेवून हा पाच किलो मीटरचा रस्ता पुर्ववत करणे आवश्यक आहे
 
अंजनी खुर्द ते शिवणी पिसा हा रस्ता केवळ साहित्याची जड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे खराब झाला असल्याने विनाविलंब संबंधित कंत्राटदाराने हा रस्ता पुर्ववत करावा. अन्यथा आम्ही कामावरील वाहने अडवून धरू.
- दिलीपराव वाघ, जि. प. सदस्यपती तथा शिवसेना नेते
 
या रस्त्यावरील जड वाहनांनच्या रहदारीमुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे अपघात होवून अनेकांना शारीरिक दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे तहसीलदार लोणार यांच्याकडे अर्ज करून संबंधित कंत्राटदारास सूचित करण्याबाबद कळविले आहे.
- विकास पिसे, सरपंच, शिवणी पिसा

(संपादन - विवेक मेतकर)