
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी अकोट येथील प्रहार जनशक्तीचे नेते तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपींचा जामीम अर्ज नामंजूर केला आहे.
अकोट (जि.अकोला) ः अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी अकोट येथील प्रहार जनशक्तीचे नेते तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपींचा जामीम अर्ज नामंजूर केला आहे.
हत्याकांडातील आरोपी शुभम हमीचंद जाट, गुंजन देविदास चिंचोळे, व शहाबाज खान इस्माइल खान हे अकोला कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांनी जामीण मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
यावर्षीच्या सुरुवातीला २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजताचे दरम्यान आकोट शहर पोलिस स्टेशन जवळ तुषार पुंडकर यांच्यावर गावठी पिस्तूल मधून गोळ्या झाडून आरोपींनी कटकारस्थान करून संगनमताने त्यांचा खून केला होता.
या प्रकरणात एकूण ७ आरोपींना अटक करून तपास करून दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी वरील तीन आरोपीनी जमानत मिळण्याकरिता अर्ज विद्यमान कोर्टात दाखल केला होता.
(संपादन - विवेक मेतकर)