esakal | प्रलोभणे दाखवून व्यभिचार करीत सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न - जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: BJPs attempt to come to power by committing adultery by showing temptation - Jayant Patil

मी पुन्हा येणार म्हणणाऱ्या नेत्यांना विरोधात बसावे लागले हे अद्यापही पचणी पडले नाही. त्यामुळे प्रलोभणे दाखवून व्यभिचार करीत सत्तेत येण्याचा याना त्या मार्गाने भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

प्रलोभणे दाखवून व्यभिचार करीत सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न - जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : मी पुन्हा येणार म्हणणाऱ्या नेत्यांना विरोधात बसावे लागले हे अद्यापही पचणी पडले नाही. त्यामुळे प्रलोभणे दाखवून व्यभिचार करीत सत्तेत येण्याचा याना त्या मार्गाने भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

विरोधी पक्ष अडचणीत असल्याने महाविकास आघाडीविरुद्ध वेगवगेळा अपप्रचार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी


अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जंयत पाटील म्हणाले की, भाजपकडून सरकारच्या कारभाराबाबत गेली वर्षभर अपप्रचार सुरू आहे. दोन-तीन महिन्यात आम्ही सत्तेत येऊ असे ते गेली वर्षभर सातत्याने सांगत आहे.

हेही वाचा -  पावसाचा इशारा अन् थंडीची लाट

विरोधकांचा अपप्रचार सुरू असला तरी महाविकास आघाडी सरकारने वर्ष पूर्ण केले. सुरुवातीला कामकाजाचे जे तीन-चार महिने मिळाले त्यात या सरकारने धाडशी व जोखमीचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोरोना संकटकाळानंतर आता स्थिती पुर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा हे सरकार ज्या विकासाचे स्वप्न घेवून काम करीत होते त्याला गीत येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मुस्कटदाबी होत असलेले नेते संपर्कात
निवडणुकीपूर्वी जे नेते भाजपमध्ये गेले होते, त्यांची तिथे मुस्कटदाबी होत आहे. याशिवाय इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पद दिल्याने भाजपमधील एक वर्ग चिडलेला आहे. ते सर्व नेते महाविकास आघाडीतील पक्षांच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - शासनाकडून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची फसवणूक

एसएससीईटी मुदतवाढिला स्थगिती
कामगार संघटनांच्या मागणीनुसास एसएससीईटीला मुदत वाढ देण्याचा आदेश निवडणूक काळात काढण्याचा प्रयत्न झाला. या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र सरकारला अडचणी आणण्यासाठी अशा प्रकारचे फाईल पुटअप करणाऱ्या झारीतील शुक्राचारांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते कुणाच्या सांगण्यावरून हे काम करतायेत हेही शोधले जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -  बँकांची कामं करायची कशी, संप आणि वीकेंडमुळे चारपैकी तीन दिवस बँका बंद​

राणे म्हणजे जंगलेली तोफ
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे मातोश्रीच्या पिंजऱ्यातील वाघ अशी टिका केली होती. त्याबाबत विचारले असताना गंजलेल्या तोफीतून निघणाऱ्या गोळ्यांचा आम्ही फारसा विचार करीत नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image