एसटीतून उतरतानाच पडला बसचालक

विवेक मेतकर
Thursday, 24 September 2020

दुपारी दोन- अडीच वाजताची वेळ...खामगावरून अकोला मध्यवर्ती आगारात एक बस येऊन पोहचली. प्रवाशीही उतरले. एसटीमधून उतरताना अचानक बस चालकांना भोवळ आली आणि जोरात खाली पडले. काय झाले बघायला प्रवाशी, वाहक, चालक आणि ऑटोरिक्क्षाचालकांची एकच गर्दी झाली.

अकोला : दुपारी दोन- अडीच वाजताची वेळ...खामगावरून अकोला मध्यवर्ती आगारात एक बस येऊन पोहचली. प्रवाशीही उतरले. एसटीमधून उतरताना अचानक बस चालकांना भोवळ आली आणि जोरात खाली पडले. काय झाले बघायला प्रवाशी, वाहक, चालक आणि ऑटोरिक्क्षाचालकांची एकच गर्दी झाली.

कुणी त्याला कोरोना झाला म्हणत जबाबदारी झटकून निघून गेले, तर कुणी म्हणाले फिट आली, कुणी म्हणाले मिरगीचा दौरा आला तर कुणी म्हणाले ही गोळी द्या, ती गोळी द्या, पाणी पाजा, कांद्याचा रस द्या.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

गर्दीतील प्रवशाच्या थैलीतील कांदा घेऊन चालकाला शुध्दीवर आणण्यात आले. मात्र, बसस्थानकात कोणताही प्रथमोपचार करताना कुणी दिसले नाही. त्याहीपेक्षा ही घटना जर प्रवासादरम्यान झाली असती तर मोठी दूर्घटनाही होण्याची शक्यता होती. सुदैवाने तसे झाले नाही. मात्र, एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी असलेला निष्काळजीपणा यानिमित्ताने समोर आला.

हेही वाचा - तीन वर्षांचा मुलगा हरवल्याने सुरू होती घालमेल; अपहरणाची चर्चा, तब्बल 21 तासानंतर आईचा जीव भांड्यात! 

खामगाव आगारातून आलेल्या एमएच ४० एन ९५४२ या बसचे चालक फिट नसताना खामगाव आगारातून निघताना प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची किती काळजी घेतल्या जाते, अशी उलट-सुलच चर्चा यावेळी बसस्थानकात सुरू होती. दरम्यान, वाहनचालक सुखरुप असले तरी यापुढे सुरक्षीत प्रवासाच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जातील हेच महत्वाचे ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: The bus driver fell while getting off the ST