शिक्षक बदल्यांच्या उडणार गोंधळ,ऑफलाईन बदल्यांमुळे धोळाची शक्‍यता अधिक

सुगत खाडे  
Friday, 17 July 2020

शिक्षक बदल्यांच्या संदर्भात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीचे जुने अनुभव पाहता यावर्षी सुद्धा शिक्षक बदल्यांचा गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. तर दूसरीकडे ऑफलाईन बदल्यांमध्ये अनियमितता होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे काही शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

अकोला  ः राज्याच्या ग्रामविकास विभागाने यावर्षी कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन तर जिल्हाअंतर्गत बदल्या ऑफलाईन पद्‌धतीने होणार आहेत.

शिक्षक बदल्यांच्या संदर्भात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीचे जुने अनुभव पाहता यावर्षी सुद्धा शिक्षक बदल्यांचा गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. तर दूसरीकडे ऑफलाईन बदल्यांमध्ये अनियमितता होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे काही शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शैक्षणिक सत्र 2018-19 ग्राम विकास विभागातर्फे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या होत्या. सदर प्रक्रियेदरम्यान कमालीचा गोंधळ उडाला होता. काही शिक्षकांची खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली करण्यात आल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. त्यामुळे अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी समन्वय समितीची स्थापन करुन शिक्षकांनी धरणे आंदोलन सुद्धा केले होते. काही शिक्षकांनी गुगल मॅपचा उपयोग करून शाळांचे अंतर लांब दाखवून सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या होत्या.

त्यासोबतच विविध संवर्गात सुद्धा बदल्यांमुळे गोंधळ उडाला होता. शिक्षक बदल्यांच्या गोंधळाचा जुना अनुभव पाहता यावर्षी सुद्धा शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ उडण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे जुने अनुभव पाहता यावर्षी सुद्धा बदली प्रक्रियेत घोळ होण्याची शक्‍यता आहे. त्यात यावर्षी ऑफलाईन पद्धतीने बदल्या होत असल्याने अनियमिततेची सुद्धा शक्‍यता वाढली आहे. असे असले तरी शिक्षण विभागाने पारदर्शक पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असा दावा केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news The confusion of teacher transfers, offline transfers are more likely to whitewash