कोरोनाचे १८ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 2 November 2020

कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. १) ११२ अहवाल प्राप्त झाले. त्यात १८ अहवाल पॉझिटिव्ह तर ९४ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त २४ रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०९ झाली आहे.
 

अकोला  ः कोरोना संसर्ग तपासणीचे रविवारी (ता. १) ११२ अहवाल प्राप्त झाले. त्यात १८ अहवाल पॉझिटिव्ह तर ९४ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त २४ रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०९ झाली आहे.

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण घटत आहेत. रविवारी (ता. १) जिल्ह्यात १८ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड व खडकी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पक्की खोली सिंधी कॅम्प, चौरे प्लॉट, शास्त्री नगर, वरुड जवळका, जीएमसी हॉस्टेल, रामदास पेठ, सिंधी कॅम्प, गणेश नगर, राऊत वाडी, मराठा नगर, मोठी उमरी, कपिलवास्तू , छोटी उमरी व पोलीस स्टेशन येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

याव्यतिरीक्त २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून चार, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून दोन, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा १० जणांना, अशा एकूण २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८४१६
- मृत - २८१
- डिस्चार्ज - ७९२६
- ॲक्टिव्ह रुग्ण - २०९

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Corona 18 new positives