अबब! कोरोनाने ओलांडला साडेतीन हजारचा टप्पा; 45 नवे पॉझिटिव्ह

सुगत खाडे  
Tuesday, 25 August 2020

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने जिल्ह्यात रुग्णांचा साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी (ता. २४) ४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. कोरोनामुळे सोमवारी एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसून १८ जणांना मात्र रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधून घरी सोडण्यात आले.
 

अकोला : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने जिल्ह्यात रुग्णांचा साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी (ता. २४) ४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. कोरोनामुळे सोमवारी एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसून १८ जणांना मात्र रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधून घरी सोडण्यात आले.

कोरोना विषाणूने सर्व थैमान घातलं आहे. कोरोनाचे सोमवारी (ता. २४) कोरोना तपासणीचे २०३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह तर १५८ अहवाल निगेटीव्ह आले. ४५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २० महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पॉझिटिव्ह रुग्ण तेल्हारा येथील १३ जण, चांगेफळ येथील १० जण, बाळापूर येथील सात जण, म्हैसपूर येथील चार जण, बोरगाव मंजू येथील दोन जण, तर उर्वरित जवाहरनगर, चांदूर, कान्हेरी गवळी, डाबकी रोड, कावसा, देशमुख फैल, गोरेगाव, पोपटखेड व जूने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान सोमवारी (ता. २४) दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर येथून दोन जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मूर्तिजापूर येथून एक जण, तर कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून दोन जणांना अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ३५२०
- मृत १४४
- डिस्चार्ज - ३०२२
- ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह -३५४
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Corona crosses three and a half thousand stage; 45 new positives