आणखी चौघांचा मृत्यू; २०३ नवे पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Corona killed four more; 203 new positives

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सोमवारी (ता. ५) कोरोना संसर्ग तपासणीचे ११२७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १००८ अहवाल निगेटीव्ह तर ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबत रॅपिडच्या तपासणीत सुद्धा ८४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांमध्ये २०३ नव्या रूग्णांची भर पडली. याव्यतिरिक्त ५७८ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला,

आणखी चौघांचा मृत्यू; २०३ नवे पॉझिटिव्ह

अकोला  ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सोमवारी (ता. ५) कोरोना संसर्ग तपासणीचे ११२७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १००८ अहवाल निगेटीव्ह तर ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबत रॅपिडच्या तपासणीत सुद्धा ८४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांमध्ये २०३ नव्या रूग्णांची भर पडली. याव्यतिरिक्त ५७८ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

कोरोना संसर्गामुळे सोमवारी (ता. ५) दिवसभरात चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यात गोलखेडी ता. मूर्तिजापूर येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या पुरुषास २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू अन्य येलवन ता. बार्शीटाकळी येथील ४९ वर्षीय पुरुषाचा झाला. त्याला २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू अकोट फैल, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. या पुरुषास २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. चौथा मृत्यू पातूर येथील ७० वर्षीय महिला रुग्णाचा झाला. या महिलेस ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशीमाहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
--------------
या भागात आढळले नवे रूग्ण
सोमवारी सकाळी ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३९ महिला व ८० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पातूर येथील १८, बाळापूर येथील १२, तेल्हारा व डाबकी रोड येथील प्रत्येकी सहा, पतखेड ता. बार्शीटाकळी येथील पाच, जठारपेठ व पारस येथील प्रत्येकी चार, अकोट येथील तीन, टिटवा ता. बार्शीटाकळी, भगीरथ नगर, खडकी, गोरक्षण रोड, मोठी उमरी, जीएमसी, सुधीर कॉलनी, सोपीनाथ व कौलखेड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित भागातील रहिवाशी रुग्णांचा समावेश आहे.
----------------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - २९०३४
- मृत ४७४
- डिस्चार्ज - २४६०३
- ॲक्टिव्ह रूग्ण - ३९५७

(संपादन - विवेक मेतकर)

Web Title: Akola News Corona Killed Four More 203 New Positives

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaBarshitakaliBalapur