कोरोनाचा स्फोट : तिघांचा बळी; १०६ नवे पॉझिटिव्ह

सुगत खाडे  
Saturday, 5 September 2020

जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ ग्रस्त रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना तपासणीचे ५२७ अहवाल शुक्रवारी (ता. ४) प्राप्त झाले. त्यापैकी १०६ अहवाल पॉझिटिव्ह, तर ४२१ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला. त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचा स्फोटच झाल्याचे दिसून आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ ग्रस्त रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना तपासणीचे ५२७ अहवाल शुक्रवारी (ता. ४) प्राप्त झाले. त्यापैकी १०६ अहवाल पॉझिटिव्ह, तर ४२१ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला. त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचा स्फोटच झाल्याचे दिसून आले.

कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनामुळे शुक्रवारी (ता. ४) तिघांचा मृत्यू झाला. त्यात पहिला मृत्यू मलकापूर येथील ५५ वर्षीय महिलेचा झाला. तिला २ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. दुसरा मृत्यू सिरसोली ता. तेल्हारा येथील ६५ वर्षीय महिलेचा झाला. तिला १९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू मूर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा झाला. त्यास २९ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. याव्यतिरीक्त कोरोनाचे १०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात ४२ महिला व ६४ पुरूषांचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

३१ रुग्णांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शुक्रवारी (ता. ४) २९ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून दोन जणांना अशा एकूण ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आले.

कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ४३५६
- मृत - १६३
- डिस्चार्ज - ३३७४
- ॲक्टीव्ह रुग्ण - ८१९
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Corona kills three; 106 new positives