esakal | कोरोना अपडेट: दोघांचा मृत्यू, १९ पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona Update: Both die, 19 positive

जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्ग तपासणीचे ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०० अहवाल निगेटिव्ह तर १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

कोरोना अपडेट: दोघांचा मृत्यू, १९ पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्ग तपासणीचे ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०० अहवाल निगेटिव्ह तर १९ अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

सकाळी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात सात महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ येथील पाच, तर उर्वरित बाळापूर, राधाकिसन प्लॉट, एमव्ही हॉस्टेल, तेल्हारा, मंगरुळ कांबे, राजंदा, महाजनी प्लॉट, मुर्तिजापूर, पातूर, खडकी व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे.

सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील दोन जण तर बाळापूर नाका येथील एक आहे. दरम्यान, आज दुपारनंतर एकूण ९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मृतांमध्ये राजंदा (ता.बार्शीटाकळी) येथील ६८ वर्षीय महिला आणि मोठी उमरी येथील ७५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. सध्या एकूम २९५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image