कोरोनाची भीती कायम, आणखी एक मृत्यू; १७ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 19 October 2020

कोरोना संसर्गजन्य रोगाने रविवारी (ता. १८) जिल्ह्यात एक रुग्णाचा बळी गेला. त्यासह १७ नवे पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत भर पडली असून सध्याच्या स्थितीला जिल्ह्यात ४५३ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.
 

अकोला  : कोरोना संसर्गजन्य रोगाने रविवारी (ता. १८) जिल्ह्यात एक रुग्णाचा बळी गेला. त्यासह १७ नवे पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत भर पडली असून सध्याच्या स्थितीला जिल्ह्यात ४५३ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.

सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्ग तपासणीचे जिल्ह्यात रविवारी (ता. १८) १३१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह तर ११४ अहवाल निगेटिव्ह आले. याव्यतिरीक्त एक रुग्णाचा बळी सुद्धा गेला. संबंधित रुग्ण देशमुख फाईल, रामदास पेठ येथील ६८ वर्षीय पुरुष होता. त्याला ४ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.

याव्यतिरीक्त रविवारी (ता. १८) सकाळी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रविवारी १३ जणांना, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथून पाच, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉस्पिटल येथून चार, बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून दोन तर हॉटेल रीजेन्सी येथून एका अशा एकूण २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८०५५
- मृत - २६५
- डिस्चार्ज - ७३३७
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४५३

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Coronas fears persist, another death; 17 new positives