esakal | गुलाबी बोंडअळीचा विळखा घट्ट होतोय...!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Cotton crop damaged due to pink bollworm in Nandura, measures needed

गत तीन वर्षापासुन अस्मानी व सुलतानी संकटाशी सामना करीत असलेला शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने होरपळत आहे. त्यातच गत कपाशीच्या बोंडावर धुमाकूळ घालणाऱ्या गुलाबी बोंडअळीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालल्याने बिटी बियाण्याच्या प्रमाणीकरणाबाबत शंकेची पाल चुकचुकत आहे.

गुलाबी बोंडअळीचा विळखा घट्ट होतोय...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

नांदुरा (जि.बुलडाणा):  गत तीन वर्षापासुन अस्मानी व सुलतानी संकटाशी सामना करीत असलेला शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने होरपळत आहे. त्यातच गत कपाशीच्या बोंडावर धुमाकूळ घालणाऱ्या गुलाबी बोंडअळीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालल्याने बिटी बियाण्याच्या प्रमाणीकरणाबाबत शंकेची पाल चुकचुकत आहे.


बियाणे व औषधी कंपन्यांची काहिंशी मिलीभगत यास कारणीभूत असून, कृषी विभागातील अधिकारी व कृषी विद्यापीठातील संशोधकांचे याबाबत अजूनही कोणतेच निर्मूलनासाठी किंवा बिजी-२ च्या पुढील स्टेजवर जाण्याची मानसिकता दिसत नसल्याने आगामी काळात पांढऱ्या सोन्याचा कॉटन बेल्ट पट्टा सद्या तरी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, इतरही पिकाच्या बियाण्यातील उगवणक्षमतेमुळे नुकसानीची पातळी वाढत चालल्याने बळीराजाच संकटात ढकलला जात आहे.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

बिटी वाण येण्याअगोदर साध्या नावाने ओळखली जाणारी नांदेड ४४, एलआरए ५१६६ किंवा इतर अनेक नावाने बाजारात मिळणाऱ्या कपाशी वाणांची शेतकरी पेरणी करीत होता. या वाणांवर बोंडअळी येत असली तरी दिवाळीनंतर थंडीच्या काळात एखादा फ्लॅश तयार होऊन कमी खर्चात त्याकाळात शेतकऱ्यांना त्यामानाने उत्पन्न मिळत होते.

अलीकडच्या काळात कपाशीवरील बोंडअळीचे आक्रमण कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी बिजी-१, बिजी-२ चे वाण बाजारात आले. सुरुवातीला शेतकऱ्यांना या वाणातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळाल्याने साधे वाणच बाजारातूनच हद्दपार झाले.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

आतातर बिजी-२ च्या जमान्यात दिवसेंदिवस बोंडअळीच्या आक्रमणातून शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, फरदडच संपुष्टात आल्याने हे वाण यापुढे पेरावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी तर सोयाबीन बियाणे उगवले नसतांनाही शेतकऱ्यांना त्याची कोणतीच नुकसान भरपाई पण मिळू शकलेली नाही.

हेही वाचा -  धोका वाढला; कोरोना रुग्णांचे दिवसभरात ८४४ अहवाल; ७० पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू

नुकसानीची पातळीही वाढली
तीन वर्षापुर्वी कपाशीवरील बोंडअळीवरीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जर संबंधित यंत्रणेने योग्यवेळी योग्य पाऊल उचलले असते तर, आज बोंडअळीचा पर्दाफास झाला असता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बोंडअळीचा फैलाव जास्त वाढल्याचे दिसत असून, या गुलाबी बोंडअळीमुळे कापुसही खराब निघत आहे. याचा परिणाम कापसाच्या दर्जा तथा उत्पादनावर झालेला असून, नुकसानीची पातळी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image