esakal | यंदा कपाशी पिकाचे उत्पन्न घटणार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Cotton yield will decline this year

खारपाण पट्ट्यात येत असलेल्या आगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावर्षी माहे ऑक्टोबरच्या शेवटी बोंडअळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे संकटाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट वाढले आहे.

यंदा कपाशी पिकाचे उत्पन्न घटणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

आगर  (जि.अकोला) ः खारपाण पट्ट्यात येत असलेल्या आगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावर्षी माहे ऑक्टोबरच्या शेवटी बोंडअळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे संकटाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट वाढले आहे.

वन्यजीव प्राण्यांच्या त्रासामुळे दरवर्षी खारपाण पट्ट्यात कपाशी पिका व्यतिरिक्त कोणतीचे पीक घेण्यात ये नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मागील वर्षी पेक्षा मोठ्या उत्साहाने कपाशी पिकाची पेरणी केली.

परंतु अचानक आलेल्या बोंडलीने शेतकऱ्यांचा घात केला आहे. या वर्षी शंभर टक्के शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या जातीची कपाशी पेरणी पूर्ण केली असून कपाशी पीक सुद्धा चांगल्या अवस्थेत दिसत होते. त्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी होता. कपाशी पिकाच्या पहिल्या वेचणी अगोदरच पावसाचे आगमन झाले.

त्यामुळे सीतादही सुद्धा पावसातच गेल्यामुळे पहिल्या वेचणीचा भाव सुद्धा शेतकऱ्यांना कमी मिळाला. असंख्य शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर बोंडअळी ने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे. सर्व परिसरात बोंडअळी आल्यावरही कृषी विभागाने मात्र शेतकऱ्यांना कुठेच मार्गदर्शन केल्याचे दिसून येत नाही.

कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या शेताचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी केल्या जात आहे.


कपाशी पिकाचे उत्पन्न घटणार
दरवर्षी होणारे कापसाचे उत्पन्न यावर्षी मोठ्या प्रमाणात घटणार आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी किमान एकरी चार ते पाच क्विंटल कपाशीचा उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत बोंडअळीच्या प्रकोपापासून कपाशीवर लाल्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी कपाशी पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती येथील प्रगतशील कास्तकार राजेंद्र काळणे यांनी दिली आहे.


पंचनामे करण्यासाठी देणार निवेदन
बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात येईल, अशी माहिती राजेंद्र तेलगोटे यांनी दिली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)